आंतरराष्ट्रीयविज्ञानविदेशस्वास्थ/ सेहत
Trending

अरे बापरे चीनमध्ये कोरोना सारखाच व्हायरस...?

पाच वर्षापूर्वी कोरोनाने सर्व जगाला हैराण केले होते. या काळात प्रत्येक देशाचा श्वास थांबला होता. आता पुन्हा एकदा चीनमध्ये एका नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुन्हा एकदा चीनमध्ये प्रत्येक  व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क बघायला मिळत आहेत. आता चीन पुन्हा जगाला नवीन महामारी देणार आहे का, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. या नव्या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे, जो आरएनए विषाणू आहे.जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-१९ सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो.ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा विषाणू प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकतो.चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस HMPV हा विषाणू वेगाने पसरत असून तेथील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. या विषाणुमुळे चीनमध्ये अनेक मृत्यु झाले असून त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. HMPV, कोरोना आणि माइकोप्लाज्मा न्यूमोनिया यासारखे आजार देखील चीनमध्ये वेगाने पसरत असल्याचंही वृत्त आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी परिस्थितीचं निरीक्षण करत असून, नागरिकांनी सातत्याने मास्क वापरावा, हातही धुवावेत, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV)देखील कोरोनाप्रमाणे मानवी श्वसनमार्गाला संक्रमित करते. हे न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटापन्यूमोव्हायरस संबंधित आहे.कोरोना फुफ्फुसांवर परिणाम करत असे परंतु हा विषाणू  श्वसनमार्गावर देखील परिणाम करतो. हे प्रामुख्याने खोकताना आणि शिंकण्याने निर्माण होणाऱ्या थेंबांद्वारे पसरत आहे. यामध्ये जास्तीत जास्त संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. हिवाळ्यात त्याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button