
सही मधी सही आहे भिमबाबाची सही
सहीवाणी जगात कुणाची सही नाही
मोबाईलवर सही असे गाडीवर सही
घरावर सही असे घडीवर सही
पुस्तकावर सही झाली सहीच सही !!१!!
घटणेवरच्या सहीने केला प्राक्रम
सहीनेच बदलीला तो हिंदूचा धर्म
किती जिव वाचविले पेनाची शाई !!२!!
नाही कुणा मारीयले बाबा तुमच्या शाईने
केवढा प्राक्रम केला त्या शाहीदच्या पेशाने
शाहीने उध्दारीले आमची लाडाची आई !!३!!
शाहीने दिले आम्हा अनेक खंड
संविधान भारताला दिले ते अखंड
मोरे बुद्ध धम्म दिला केली पुण्याई !!४!!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप वेळ ७,५ स७२१८५९६४४६/७६६६७४९३०३दि,२०,४,२०२५
.