दगडाचे भाग्य.!

काही काही दगडाचं भाग्य असतं प्रत्येक दगडाला बाप असतं कलेतुन तो दिसत नसतं काही काही दगडाचं भाग्य असतं. !!
मग ती तो दगड लाकूड सोनं चांदी असे माती
जे त्यांना जन्म घालतो त्या नावाची होते माती
ह्याचे सर्वांचे भान हारपलेलं असतं !!१!!
एका दगड जिव घेतो, एक दगड देव होतो एका दगडावर आकाशी मजले होतो असच हे युगानुयुगे घडतं आलेलं दिसतं. !!२!!
एक दगड मड्यावरचचा चिरा होतो एक दगड शेताच्या बांधावरची खुणं होतो एक दगड किलो मीटरची सिमा असतं !!३!!
एक दगड संडासाला वापरल्या जातो
निर्जीव दगड तो माणसाला झुकवत असतो
असच हे पुर्वापार चालतच राहातं !!४!!
माणस आदराने दगड धोड्यांची पुजा करतात स्वाहान त्याचा मलिदा खाऊन, वर तंगडी करतात अस कुठ कुठं घडतांना दिसतं. !!५!!
काही तर बध्दी असुन विटंबना करतं आहेत किल्ले तिकडे भुईसपाट झाले, मुर्त्याला जिव मारत आहेत घरी नाही पण दारी मुर्त्यावर आक्रोश करतं. ६!!
या जगात दगडाची उत्पत्ती खुप मोठी खाणं आहे हेच दगड धर्मा धर्मात हिंसा करुन देश भडकवत आहे भावुक मणाला हे वेठिसी धरुन नष्ट करतं !!७!!
दगड मात्र अजमर राहून माणसाला भुलं पाडतोअंधश्रद्धेच्या विळख्यात माणसाला बुडवून जातोयालाच काल चेक्र रोज रोज फिरत असतं !!८!!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली