विद्रोही मराठी साहित्य संमेलनास आज पासून सुरुवात.!
'शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला' हे नाटक सायंकाळी सुरू होणार आहे

छत्रपती संभाजीनगर : १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन ला आजपासून सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजी नगर येथील आमखास मैदानात मलिक अंबर नगरीत विद्रोही मराठी साहित्य संमेलनास सुरुवात होणार आहे. आज पहिल्या दिवशी जागतिक कीर्तीचे प्रबोधनात्मक सुप्रसिद्ध नाटक ‘शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला’ हे नाटक सायंकाळी सात वाजता सर्वांसाठी मोफत सुरू होणार आहे.
तसेच २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते आमखास मैदानापर्यंत सांस्कृतिक विचारधारा यात्रा काढण्यात येईल.नंतर १०:३० वाजता विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक राणा, हिंदी साहित्यिक कवी भारती (दिल्ली) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तसेच ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे, कवयित्री प्रा.प्रतिभा अहिरे, प्रा. प्रल्हाद लुलेकर, प्रख्यात उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन, सूर्यकांता ताई गाडे यांची उपस्थिती राहणार आहेत. विद्रोही साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.