
समाधान केलं बाई तुला,
मतदानाच्या वेळी झाली आमची दिवाळी,
हिच साधी साडी चोळी !! ध्रृ!!
जरी तुझ्या घरची गरीबी,
तु तुझ्या घरी जन्मभर पुरणार नाही,
राहा सुखी तुझ्या घरी नको तुझ्या
घरची मला पुरण पोळी !!१!!
आता बंद झाली फुकटाची गाडी !
अर्धे तिकीट आणि फुकटाची साडी !!
लूटली बहिण म्हणुन सादी भोळी. !!२!!
घेऊन तुमचे तेव्हा मत,
तुटले आता सारे गोत !
तुम्हा डोक्यात पैशाचे भुत,
कागदासाठी झुंबड दिन रात
आता केली अस्मितेची होळी !!३!!
मतांसाठी फसविले बहिणीला !
मी येत नाही तुला भेटण्याला !!
कसा मांजरांने घात केला !
बंद केले सर्व सवलतीला !!
तेव्हा दिली आफूची गोळी !!४!!
पुरुष प्रधान संस्कृती राजदरबारी !
कौवरवापरी लावले डावावरी !!
असा चौरस खेळाची ही लाचारी !
गोडी गोडीने केली तेव्हा फसवेगिरी !!
भरुन काढली माघली ती पोकळी !!५!!
सवलतीचे दावती काही कारणं !
पोट भरलं सारं तुमच्या मतानं !!
व्हि एम चा आधारांच्या साथीनं !
पोखरले भिमाच्या लोकशाहीनं !!
असे झाले सारे जुलूम गोंधळी !!६!!
बोलून चालून बहिणीला दिल्या तुरी !
तुमच्या सवलती बंद होणार आशा पुरी !!
ब्यालंस सारख्या सवलती देवु घरच्या घरी !
पुढच्या पंचवार्षिकला देवू तुम्हा काही तरी !!
आता प्रत्येकांच्या मनात पडलाया खळ !!७!!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६. / ७६६६७४९३०३ दि,२०,३,२०२५