डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
. हा पुतळा बनविण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत होत आहे

द फ्रेम न्यूज नेटवर्क
दिल्ली : दि.१९ शासनातर्फे मुंबईत इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. हा पुतळा बनविण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत होत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या कार्यशाळेस भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी यांनी चर्चा केली. त्यांच्या समवेत शिल्पकार राम सुतार, त्यांचे पुत्र, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख इ. उपस्थित होते.

तसेच सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी मा.सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी चर्चा केली.