आज महात्मा फुले १९८ व्या जयंती दिनानिमित्ताने क्रांतीसुर्यास कोटी कोटी अभिवादन ?

दिवसभर चिमणाबाईने काम केले, संध्याकाळी चुल पेटवली भाकऱ्या थापल्या तस मनात माहीत होते, की आता आपल्या गरोदरपणाचे दिस भरले म्हणून, पण आज उध्याचा दिस असेलच,हा विचार मनात घोळत होता, जेवण करून आथुरनावर आंग टाकलं,तसा आन्नाजाची जरा धुंदी चढली म्हणून थोडा डोळा लागला, रात्रीचा तिसरा प्रहर संपला होता, पोटात कळ निघाली तसी मी जागी झाली, आणि मालकाला आवाज दिला,उठा बरं दाईनीला बोलवा तसं गोविंदराव यांना ही माहित झाले,दाईनीला बोलावून आनल्यावर, काय ग चिमणे दिस भरलं वाटतं नाही का ? तसी कायबी फिकीर नग म्या हाय की साथीला,सकाळ झाली चिमणाबाईला आधीकच वेधना होत होत्या, तेव्हा फक्त आयुर्वेदिक दवा होती, डॉक्टरचा पत्ता नव्हता, सकाळी सकाळी चिमणाबाई बाळातीन झाली, आणि दाईनबाई घरातुन बाहेर आली,आर गोविंदा तुला पोरं झालं लयं झाक हाय बरं,तो दिवस होता ११ एप्रिल १८२७ गोविंदाला आनंद झाला , आणि पाचान पाच दिसाची पाचवी केली, जवळच्या बाया पोरी बोलाल्या बाळाला पाळण्यात घालून बाया पोरी पाळणा गात होत्या ?
पाळणा
पहिल्या दिवशी ठेवू बाळाचे नाव गोरे कुळातील गाजेल नाव चिमणाबाईच नाव जाईल गावोगाव कटगुन गावाचं होईल नाव जो बाळा जो जो रे जो
दुसऱ्या दिसी बाळ खेळेल बाई घरं अंगन काही पुरणार नाही कौतुक होईल आमच्या चिमणाबाई गोविंद गोऱ्याचे नाव उध्दरुन नेई जो बाळा जो जो रे
तिसऱ्या दिसी बाळ शाळेला जाई शिकुन शाळा लयी हूशार होई जोतिबा नाव ठेऊ गं चिमणाबाई लयी लयी पोरं गुणवान होई जो बाळा जो जो रे जो
चवथ्या दिसी करेल समाज कार्य जातीपातीत दाविल शौर्य एकीच्या समाजाला दाविल धेर्य शिक्षण मोठे हे एकमेव कार्य जो बाळा जो जो रे जो
पाचव्या दिवशी पाचवी केली जोतिबाने ज्योतीने जोत लाविली कार्य जगी त्यांने अनमोल केली सारेच जोतिबा म्हणु लागली जो बाळा जो जो रे जो
सन १८२७ सालाला तारीख ११ एप्रिल आला जोतिबाचा आज जलम झाला किरती करुन जोती थोर हा झाला जो बाळा जो जो रे
आज आपणाला सर्व भारतीय बांधवांना जोतिबा फुले यांनी शिक्षण देवून ज्ञानाचे दरवाजे आणि खिडक्या खुल्या केल्या , शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजावून सांगितले, म्हणुन आज भारताच्या बाहेर जोतिबा फुले याचे कौतुक केल्या जात आहे, फुले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावचे रहिवासी होते, पण कामानिमित्ताने ते पुण्याच्या पाणवडी या खेड्यात राहात होते, तेव्हा इंग्रज सरकारने त्यांना जमीन दिली आणि त्या जमिनीवर ते काबाडकष्ट करत होते, ते फुलांचा व्यवसाय करत असताना,त्यांचे नाव फुले पडले, म्हणून त्यांना फुले या नावाने प्रख्यात झाले, ते माळी नसून कट्टर कृषी प्रधान हाडामासाचे शेतकरी होते, शेतात विहीर खोदली होती ते पाणी मोटेने देत होते, पाण्यापासून किती उत्पादन मिळते ते त्याचा लक्षात आले, म्हणुन बाजारात शेती मालाला भाव योग्य मिळत नाही, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला, शेतीला पाणीपुरवठा असला तेव्हाच उत्पादन भरघोस होते तेव्हा खडकवासला मुठा नदीवर १८८९ मध्ये पायभरणी केली, हे भारतामध्यले पहिले धरन आहे, पुढे शुद्र आणि अतीशुद्र हे का आहेत, तर यांना शिक्षणाचा अभाव आहे म्हणुन, तेव्हा पहिली शाळा भिडेवाड्यात उभी केली, मग काय ब्रृणहत्या, अंतरजाती विवाह केला,दुसऱ्याचे मुल दत्तक घेऊन त्यांना पित्याच्यापरी आधार दिला,महिलाचे केशवपन बंद केले,नाव्यांचा संप घडवून आणला, आशा समाज कार्याने जोतिबा फुले हे मोठे झाले, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला प्रथम सुरवात केली, आणि शेवटी आर्ध्या अंगी पाॅरलेस झाला, शेवटी त्यांना रोगाने किव केली नाही, शेवटी हे मोल्यवान जग सोडून गेले,त्यांच्या या अथांग कार्यामुळे आपण त्यांची १९८ वी जयंती साजरी करत आहेत, या जयतीदिनिमीताने तयांना कोटी कोटी अभिवादन सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंगलकामना धन्यवाद जय सत्यशोधक लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप वेळ ६,५७२२८५०६४४६ / ७६६६७४९३९३०३ दि,११,४,२०२५