ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीय

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करणार- मुख्यमंत्री

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे

गडचिरोली : गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.

” आज आपल्या कॅलेंडर प्रमाणे वर्षाचा पहिला दिवस आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्वांची भेट घेण्याची संधी मला मिळाली म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि नागरिक सुविधा केंद्र सुरू होत आहे. मला विश्वास आहे या परिसरा करता एक अतिशय महत्त्वाची सुरुवात असेल, आणि विकास आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता हे केंद्र एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरेल. हा मला विश्वास आहे. गडचिरोली पासून २०० किलोमीटर दूर अशा सगळ्या सुदूर भागाचा विकास व्हावा याकरिता हे केंद्र या ठिकाणी सुरू केलेल आहे.आणि मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम करत आज या ठिकाणी आपण हे काम करू शकलो सगळ्यात महत्त्वाचं आहे की माओवाद्यांनी जे स्मारक तयार केलं होतं हे स्मारक भारतीय संविधानाचा विरोध करण्याकरता तयार करण्यात आलेला स्मारक होतं आज ते स्मारक उध्वस्त झाला आहे आणि त्याऐवजी आताही भूमी भगवान बिरसा मुंडांची ओळखली जाईल ही आपल्या सर्वांकरिता अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारचा हा विषय आपल्याला कल्पना आहे. की वर्षानुवर्ष माओवादामुळे आपल्या भागाचा विकास होऊ शकला नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान ते आम्हाला मान्य नाही. आम्ही त्या संविधानाने चालणार नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी विचार मांडला आणि त्यातून लोकांना विकासापासून वंचित ठेवलं. पण आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. विशेषता ज्या बारा गावांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन सांगितलं आम्हाला संविधान पाहिजे आम्हाला विकास पाहिजे आम्हाला हिंसा नको आम्हाला या ठिकाणी आमच्या मुलांकरता एक चांगलं जीवन पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या करता राशन पाणी बंद केलं   आणि त्यांनी एलईडी त्या ठिकाणी त्यांनी लावले होते तेही पोलीस ठाण्यामध्ये जमा केले. हे जे धैर्य आपण दाखवले त्याबद्दल आपल्या सर्वांना मी सलाम करतो. आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो. आणि आपण आपल्या पुढच्या पिढ्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आपल्याला कल्पना महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकारने एक निर्णय घेतला गडचिरोली जिल्ह्याला राज्यातला शेवटचा जिल्हा म्हणायचं शेवटचा जिल्हा आम्ही सांगितलं नाही हा राज्यातला शेवटचा जिल्हा नाही राज्याची सुरुवात  गडचिरोली जिल्ह्या पासून होते राज्याचा पहिला जिल्हा आहे.आता इथे येण्यापूर्वी मी आहेर येथील दर्जेवाडा या एसटी उद्घाटन करून त्या भागामध्ये रस्ता आणि फुल करून आपण एसटी बस सुरू केली. आणि छत्तीसगड पर्यंत आपली बस जाणार आहे.७५ वर्ष आता आपल्या संविधानाला झाले ७८ वर्षे स्वातंत्र्याला झाले .पण या भागांमध्ये कधीही मुख्यमंत्री आला नव्हता आणि कधीही बसची सुरुवात झाली नव्हती. ती सुरुवात आज आपण केलेली आहे. आणि तुम्ही चिंता तुमच्या करू नका आपल्याला इकडेही जो बावीस किलोमीटर चा रस्ता तयार करायचा आहे कुठपर्यंत जाणार आहे तोही रस्ता पूर्ण करू जेणेकरून तुम्हाला थेट प्रमाणात कनेक्टिव्हिटी निश्चितपणे मिळेल जवळजवळ आपण गेल्या दोन वर्षांमध्ये वांगीतुरी असेल किंवा दर्जेवाडा असेल या ठिकाणी पोलीस आऊट पोस्ट तयार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीसदादा लाउराच्या माध्यमातून पोलिस प्रशासन आणि राज्य प्रशासनाच्या माध्यमातून, जिल्ह्या प्रशासनाच्या माध्यमातून विकासाच्या योजना या लोकांपर्यंत पोहचू लागल्या आज आपण पाहू शकतो.हे काम करत असताना पुलाची काम असतील किंवा मोबाइलचे टाॅवर असतील हे देखील आपण करतो. माओवाद्यी जरी सातत्याने विरोध करत असतात. त्यांना फुलाची काम नको रस्त्याची काम नको मोबाईलचे टावर नको पण आमच्या नवीन पिढीला मोबाईलचे टावेल हवे आहेत आणि मोबाईलच्या माध्यमातून टॉवरच्या माध्यमातून केवळ कनेक्टिव्हिटी पुसत नाही तर त्यातन शिक्षणही चांगल्या पद्धतीने पुस्तक आरोग्य  सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि त्यातनं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन होतो. आणि म्हणून हे काम आज आपण हे काम करत आहे. मला या गोष्टीचा सुद्धा आनंद आहे गेल्या चार वर्षांमध्ये आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे एकही तरुण आणि तरुणी माओवाद्यां मध्ये भरती झालेली नाही. कोणीच आता जात नाही. याउलट जे मोठे मोठे माओवादी होते त्यांनी आत्मसमर्पण करणं चालू केलं आहे. तेही आता निर्धार करतायेत. की भारतीय संविधानाने राज्य केलं ते राष्ट्र तयार केलं त्याच्या मुख्य झाले मध्येच आम्ही काम करू आणि आता हळूहळू त्यांच्याही मनामध्ये एक मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत आहे. मला विश्वास आहे की पुढच्या दोन वर्षांमध्ये हा संपूर्ण मवाद या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल आणि विकासाची काम झाल्यामुळे या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये एक मोठा परिवर्तन येईल गरिबी दूर होईल शेतकरी असेल शेतमजूर असेल का वनमजूर असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मोठा परिवर्तन हे निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. म्हणूनच मी हा निर्णय केला की आपण नवीन वर्षाची पहिली पहाट ही गडचिरोलीच्या आमच्या जनतेसोबत आणि गडचिरोलीतल्या आमच्या जवानांसोबत घालवायची जेणेकरून आता गडचिरोलीमध्ये सूर्योदय होत आहे. त्याने नवनवीन उद्योग येत आहेत एअरपोर्ट येत आहे इथे मेडिकल कॉलेज होत आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मोठ्या परिवर्तन दिसत आहे ते परिवर्तन शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे विशेषतः आमचा ज्या काही महिला भगिनी आहेत यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम द्यायचं दोन पैसे त्यांच्याकडे आले तर चांगल्या प्रकारे ते आपले जीवन घडवू शकतात. आमचा प्रयत्न आहे आज “लाडकी बहिण” सारखी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून त्या अंतर्गत आमच्या बहिणींना १५००₹ आपण देतोय. शेतकऱ्यांकरिता आपण “शेतकरी सन्मान योजना” आणलेली आहे त्याना आपण १२०००₹ देतोय. आणि विविध योजनांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे शेतीत काम करता आलं पाहिजे. आता सगळ्या शेतकऱ्यांना डिझेलचा पंप नाही तर सोलार चा पंप देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. ज्या माध्यमातून आमचे जे आदिवासी शेतकरी आहेत त्यांना एक नवा पैसा सुद्धा लागणार नाही. दीड-दोन लाख रुपयाचा पंप त्यांना मोफत देण्याचे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांनाही मदत झाली पाहिजे. आमच्या शेतमजूर मजुरांना मदत झाली पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न आहे. म्हणून माझ्या निमित्ताने मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आता शिक्षण आरोग्य शिक्षण आपल्यापर्यंत पोहोचते. आपली नवीन पिढी ही विकासाकडे गेली पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे या दृष्टीने आपला हा सगळा प्रयत्न आहे. आणि त्यात तुमचं जे समर्थन मिळते तुमची जी साथ मिळते ती सगळ्यात महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला एवढेच सांगतो महाराष्ट्राचं सरकार जरी मुंबईमध्ये बसलं असेल तरी आमची नजर ही गडचिरोलीचे जिल्ह्याकडे आहे. पेमगुंडा हे जरी मुंबईपासून बाराशे चौदाशे किलोमीटर दूर असलं तरी तुम्ही काळजी करू नका तुम्ही आमचे शेजारी आहात अशा प्रकारे तुमच्याकडे लक्ष देऊन तुमचे जे विषय आहेत ते आपण विषय मार्गी लावत मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचे मनापासून अभिनंदन करतो की इथे पोलीस आपला जीव धोक्यात घालून केवळ माओवाद्यांशी लढत नाही तर आमचे पोलीस हे जिल्हा प्रशासनाच्या मदतीला विकासाचा प्रत्येक कार्य ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि म्हणून त्यांचं आणि वेगवेगळ्या जिल्हा प्रशासन असेल सगळ्यांचा मनापासून अभिनंदन करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button