शहर पोलीस उपायुक्त श्री. नितीन बगाटे यांच्या पुढाकारातून जप्त मॉडिफाइड सायलेन्सरपासून स्पेस रॉकेट स्मारकाचे लोकार्पण.!
५ महिन्यात जप्त ३०० सायलेन्सर पासून आकर्षक स्पेस रॉकेट तयार करण्यात आले.

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर येथील सुप्रसिद्ध चौक क्रांती चौक येथे शहर पोलीस उपायुक्त श्री नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून जप्त केलेल्या सायलेन्सर पासून स्पेस रॉकेट उभारण्यात आलेल्या स्मारकाचे लोकार्पण करून बगाटे यांच्या संकल्पनेचेे कौतुक केले.कर्कश आवाजाला थांबवत, सौंदर्य आणि सामाजिक संदेश देणाऱ्या या अद्वितीय स्मारकामुळे शहराच्या आणि सौंदर्यात नवा भर घालणारा एक सुंदर उपक्रम साकार झाला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी वाहनांचे करणे कर्कश आवाज करत जाणाऱ्या दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्याची मोहीम पोलीस आयु उपायुक्त नितीन बगाटे यांनी हाती घेतले होते पाच महिन्यात जप्त ३०० सायलेन्सर पासून आकर्षक स्पेस रॉकेट तयार करण्यात आले या स्पेस रॉकेट चे शनिवारी क्रांती चौकातील सौंदर्य बेटावर पालकमंत्री श्री संजय शिरसाट यांच्या हस्ते या स्पेस रॉकेटचे लोकार्पण करण्यात आले यावेळी मनपा प्रशासक जी श्रीकांत तसेच उपायुक्त नितीन बगाटे माजी महापौर नंदकुमार घडले विकास जैन व उद्योजक सुनील किर्तन यांची प्रमुख उपस्थिती होती किर्दक यांच्या कंपनीत हे स्पेस रॉकेट तयार करण्यात आल्याचे श्री बगाटे यांनी सांगितले.बगाटे यांच्या संकल्पनेचेे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. उपायुक्त श्री. नितीन बगाटे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.