‘मसिआ ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६’ सर्वात मोठे प्रदर्शन होणार

छत्रपती संभाजीनगर : ७/०६/२०२५ मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर म्हणजे (मसीआ) ही महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील लघु उद्योगांचे प्रतीक निधित्व करणारी सर्वात मोठी अग्रगण्य संघटना आहे ही संघटना गेल्या ४८ वर्षापासून मराठवाड्यातील औद्योगिक विकासासाठी अविरत कार्य करत आहे. तसेच या संघटनेने छत्रपती संभाजी नगर शहर मराठवाडा आणि एकंदरीत उद्योगांच्या विकासासाठी मसिआ हि संघटना मागील २७ वर्षांपासून दर तीन वर्षांनी ‘एडव्टेहान्जटेज महाराष्ट्र एक्सपो’ ह्या औद्योगिक प्रदर्शनाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करीत असते.
‘ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो २०२३’ च्या यशस्वी आयोजना नंतर ‘मसिआ ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६’ हे ९ वेळ सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथे दि.८ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान महाराष्ट्रातील व प्रामुख्याने मराठवाड्यातील औद्योगिक विकासास चालना देण्यासाठी भव्य स्वरूपात ऑरिक डीएमआयसी शेंद्रा छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात येत आहे.
‘मसिआ ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६’ औद्योगिक प्रदर्शनाचे वैशिष्ट्य
मराठवाडा विभागातील औद्योगिक संधींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे स्थानिक उद्योजक महिला उद्योजक व नव उद्योजक यांना नवीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे निर्यातक्षम उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे तसेच मराठवाड्यातील बेरोजगारांसाठी उद्योगाच्या तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा एकमेव उद्दिष्ट आहे छत्रपती संभाजी नगर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा व येथील स्थानिक उद्योग व्यापार कृषी व पारंपारिक कला इत्यादी वृद्धिगंत व्हावी यासाठी हे औद्योगिक प्रदर्शन उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
“या प्रदर्शनाद्वारे नवीन औद्योगिक संधी, गुंतवणूक संधी, सामंजस्य करार, जॉइंट वेंचर, टेक्निकल कोलाब्रेशन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, निर्यात अशा अनेक संधी उपलब्ध होणार आहेत प्रदर्शनाची व्याप्ती लक्षात घेता आम्ही सर्व उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योगाशी निगडित सेवा, सोयी सुविधा, पुरविणाऱ्या कंपन्या डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, विविध तंत्र शिक्षण संस्था महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी इत्यादींना आवाहन करतो की या भव्य प्रदर्शनात सक्रिय सहभाग घ्यावा प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी व औद्योगिक प्रदर्शनाचा आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा”
अध्यक्ष – अर्जुन गायकवाड, संयोजक – अनिल ए. पाटील, संयोजक – चेतन जी.राऊत. मसिआ ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६