पत्रकार सचिन अंभोरे यांना "समाजरत्न" पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर | दि. १ /०८/२०२५ लोकशाहीर, साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सर्व पक्षीय शहर जिल्हा जयंती उत्सव महासंघाच्या वतीने वतीने पत्रकार सचिन लिला सुखदेव अंभोरे यांना “समाजरत्न” पुरस्कार देऊन शुक्रवारी (दि. १) सन्मानित करण्यात आले. उत्सव महासंघाचे अध्यक्ष विजय मगरे यांच्या मार्गदर्शनात डॉ.अण्णाभाऊ साठे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजू भालेराव, अनिल ढोके यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सर्व पक्षीय जिल्हा जयंती उत्सव महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराबद्दल पत्रकार सचिन अंभोरे यांचे जयंती उत्सव महासंघाचे अध्यक्ष विजय मगरे, डॉ. अण्णाभाऊ साठे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजू भालेराव, अनिल ढोके, जॉन आव्हाड, सुभाष पाचुंदे, किरण रगडे, रामदास नाडे, विलास भिसे, विलास सौदागर, विनायक वाघुले, योगेश नाडे, सुरेश नाडे, सुधाकर चांदणे, किरण गंगावणे अजय राऊत, विजय भालेराव, समाधान नाडे यांनी अभिनंदन केले आहे.