हर्सुल येथिल बाबासाहेबांच्या स्मारकाचे सुशोभिकरण मुख्य चौकात करा नसता पुतळा काढु देणार नाही
हर्सुल अतिक्रमणा विरोधात एकवटले गावकरी व सर्वं पक्षिय आंबेडकरी संघटनाचा प्रशासनाला इशारा..!

विश्वरत्न परमपुज्य डॉ-बाबासाहेपब आंबेडकर यांचा महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेला दुसरा ऐतिहासिक पुतळा दि-२८ मे १९६६ रोजी भीमसैनिक व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व विनायक पाटील यांच्या हस्ते झाले होते आता मनपा मनपा प्रशासनाने तो पुतळाही काढुन घेण्याचा वट हुकुम जारी केला आहे.
आज स्थानिक नागरीक व आंबेडकरी चळवळीच्या भिमसैनिकांनी निर्णायक बैठक घेवुन महत्वाचे ठराव यावेळी घेण्यात आले.प्रशासनाने आंबेडकरी चळवळीला हलक्यात घेवु नये.समाज अस्मितेच्या लढ्यात आम्ही सदैव तत्पर आहोत.असा नारा यावेळी देण्यात आला..या वेळी समाजबांधवांच्या वतीने काही महत्वाचे ठराव घेण्यात आले.
१) विश्वरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ऐतिहासिक असल्याने तो जशास तसा सुशोभीकरण करुन रस्त्याच्या मधोमध बसविण्यात यावा.
२)निष्काशीत होत असलेले ऐतिहासिक बौद्ध विहाराला लगतची असलेली वळु संगोपन केंद्राची जमिन संपादीत करुन त्याठिकाणी शासन निधीतुन तत्काळ भव्य बुद्ध विहार बांधण्याचे काम सुरु करण्यात यावे.
३) विकासाच्या नावावर निष्काशित होणार्या हर्सुल येथिल व्यापारी व निवासी मालमत्ताचे प्रशासना कडुन नागरीकांचे याच रोड लगत असलेल्या शासकीय जमिनींवर पुनर्वसन करण्यात यावे.
४) अगोदर बाबासाहेबांच्या स्मारकाचे व बुद्ध विहाराचे काम बाजुची शासकीय जागा संपादीत करुन चालु करावे व नंतरच हे आम्ही ते काढुन घेवु.
असे महत्वाचे ठराव यावेळी उपस्थित समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आले आहेत.आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष हे म्हणाले की, आंंबेडकरी चळवळीच्या सामाजिक अस्मितेवर घाला घालने सुरु आहे सर्व समाज बांधवानी आप आपले गट तट पक्ष संघटना मोठेपणा छोटेपणा बाजुला सोडून आपल्या समाज अस्मीतेच्या प्रश्नावर एकत्र यावे.नसता समाज तुम्हाला कदापी माफ करणार नाही,आपण लोकशाही मार्गाने शाषनाकडे पाठपुरावा करुन या सर्वं मागण्या पुर्ण करुण घेऊ व त्यानंतरच याठिकाणी पुढील कारवाई होईल, प्रशासनाने आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आंंबेडकरी समाज रस्त्यांवर उतरेल असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना केले आहे.
यावेळी प्रामुख्याने उपस्थित दिपक निकाळजे,अशोक हीवराळे,मनोज जाधव,अमित वाहुळ,प्रातोष वाघमारे,आनंद कस्तुरे,जयेश अभंग,पुनम गंगावणे,नागेश थोरात,सतिश जाधव,तुशार आडके,अरुण पाईकडे, राजकुमार जाधव, सचिन जोगदंडे, संतोष चव्हाण,व समस्त आंंबेडकरी चळवळीशी निष्ठावान भिमसैनिकांना माता भगिनी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपल्या मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आपला दिपक मगनराव निकाळजे सर्वं पक्षिय आंंबेडकरवादी पक्ष व संघटना आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्य