महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने छायाचित्रकार सुनील थोटे यांना श्रद्धांजली

छत्रपती संभाजीनगर | दि 8 : सामाजिक, राजकीय यासह विविध क्षेत्रात प्रचंड दांडगा जनसंपर्क असणारे दैनिक पुढारी प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील थोटे यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई. विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर च्या वतीने जेष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, पत्रकार संघांचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष छबूराव ताके, पत्रकार सचिन लीला सुखदेव अंभोरे, प्रशांत सूर्यतळे, महेंद्र डेंगळे, जे. ई. भांबर्डे, देविदास कोळेकर, सुजित ताजणे, रवींद्र लांडगे, आनंद अंभोरे, माधव खिल्लारे आदींची उपस्थिती होती. यावेळी जेष्ठ पत्रकार अण्णा वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छायाचित्रकार सुनील थोटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनील थोटे हे छायाचित्रांच्या माध्यमातून कायम प्रत्येकाच्या स्मरनात राहतील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.