ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती
टी २० प्रकारात खेळत राहील असे स्मिथ यांने सुचित केलं आहे.

द फ्रेम न्यूज नेटवर्क
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर स्मिथने हा निर्णय घेतला. एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी कसोटी आणि टी २० प्रकारात खेळत राहील असे स्मिथ यांने सुचित केलं आहे.
“एक दिवसीय कारकिर्दीचा मी भरपूर आनंद लुटला या वाटचालीत अनेक समाधान आणि आनंद देणाऱ्या आठवणी आहेत दोन विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होणार हे माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे सांग म्हणून प्रत्येक क्षण जगलो आहे.आणि आता हीच निवृत्तीची योग्य वेळ आहे”
स्मिथच्या वनडे कारकिर्दी विषयी बोलायचं झालं, तर त्याने १७० वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. आणि या संघाकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारा तो १६ वा खेळाडू आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ५८०० धावा केल्या आहेत, त्यात १२ शतकं व ३५ अर्धशतक आहेत.