कर्णधार रोहित शर्माला त्याच्या शरीरयष्टी वरून शमा मोहम्मद यांची टीका
शमा मोहम्मद यांनी एक्स पोस्ट वरून रोहित शर्माला त्याच्या शरीरयष्टीमुळे टीका केली आहे.

द फ्रेम न्यूज नेटवर्क
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारताने रविवारी न्यूझीलंड संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच आता उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंतच्या झालेल्या सर्वसामान्यांमध्ये भारतीय संघाने खूप पराक्रमी कामगिरी बजावली आहे. भारताच्या विजयानंतर भारतीय संघाचे चाहत्यांकडून तोंड भरून कौतुक होत आहे.पण आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तान येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकेत त्याचा फॉर्म अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एक्स पोस्ट वरून रोहित शर्माला त्याच्या शरीरयष्टीमुळे टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्त्या क्षमा मोहम्मद यांनी म्हटले होते की “रोहित शर्मा खेळाडू म्हणून खूप लठ्ठ असून त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेच तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे”तसेच मोहम्मद शमा पुढे म्हणाल्या रोहित शर्मा मध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड ,महेंद्रसिगं धोनी, विराट कोहली कपिल देव, रवी शास्त्री आणि इतरांकडे पहा त्याच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितका सामान्य क्रिकेटपटू आहे त्याला नशिबाने करण्यात आहार पदाची संधी मिळाली.आणि रोहित शर्मा कर्णधार म्हणून अपयशी असल्याचा सुद्धा टोमणा त्यांनी मारला आहे.