छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रवादी- अजित पवारलेख
Trending

ज्येष्ठ साहित्यिक 'नरेंद्र चपळगांवकर' यांच ८८ व्या वर्षी निधन..!

त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे"- उपमुख्यमंत्री अजित पवार

द फ्रेम न्यूज

जेष्ठ साहित्यिक लेखक आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

छत्रपती संभाजीनगर : मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केलेले चपळगांवकर यांनी, ७० च्या दशकात बीड इथं वकिली केली, आणि ८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली.

१९९९ साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रीय राहिले. माजलगाव इथं झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन तसंच वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भुषवली होती.

चपळगांवकर यांची अनंत भालेराव-काळ आणि कर्तृत्व, कर्मयोगी संन्यासी, कहाणी हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधीमंडळ आणि न्यायसंस्था, मनातली माणसे, संस्थानी माणसे, हरवलेले स्नेहबंध, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, यासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं, चपळगांवकर यांची समग्र माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाचं नुकतचं लोकार्पण केलं आहे. चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना आदरांजली वाहिली आहे. ते म्हणाले की ” चपळगावकर यांच्या निधनानं सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे.”

” त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे”., अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button