ताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीयविज्ञानस्वास्थ/ सेहत
Trending

" HMPV व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका, कपोलकल्पित माहितीवर विश्वास ठेवू नका " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील आरोग्य विभाग अलर्ट

चीनमध्ये HMPV व्हायरसचे  दिवसेंदिवस रूग वाढत असताना. आता भारतामध्ये देखील एचएमपीव्हीचा रूग्ण सापडला आहे.भारतातील पहिला रूग्ण कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये आढळला असल्याची माहिती आहे. दोन अर्भकांना याची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.त्यातील एक अर्भक आठ महिन्याचा आहे. आणि दुसरा तीन महिन्याचा अर्भक आहे. या दोन अर्भका पैकी तीन महिन्याच्या अर्भकास रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. तर आठ महिन्याच्या अर्भकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणे दिसून येतात. या आजाराचा विषाणू श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं कळवलं आहे. तरीही नागरिकांनी याबाबत घ्यावयाच्या काळजी संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

काय करावे :

• जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

• साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

• ताप खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

• भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

• संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटिलेशन) होईल,याची दक्षता घ्या.

काय करू नये :

• हस्तांदोलन

• टिशू पेपर आणि रुमालाचा पूनर्वापर

• आजारी लोकांशी जवळचा संपर्क

• डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.

• सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.

• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

“HMPV व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका, कपोलकल्पित माहितीवर विश्वास ठेवू नका ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच जनतेला आवाहन केलं आहे. ते म्हणाले की HMPV या व्हायरसमुळे घाबरण्याचे कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही यापूर्वी हा व्हायरस आला आहे पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना माहिती देण्याचे ठरवला आहे या व्हायरसला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही यासंदर्भातील कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल तीच माहिती द्यावी.आरोग्य विभागाची बैठक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक चालू आहे, असेही त्यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button