
१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात बजावली होती मोलाची कामगिरी.

चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आयुध निर्माणी प्रवेशद्वारा जवळ विजयंता रणगाड्याची स्थापना, भारत – पाकिस्तान युद्धात बजावली होती. मोलाची कामगिरी.सन 1971 मधे पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावून या युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या सेवानिवृत्त “विजयंता” या रणगाड्याची भद्रावती येथील आयुध निर्माणी चांदाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्थापना करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. सर्व कामगार संघटनेचे नेते तथा कर्मचारी उपस्थित होते. सेवानिवृत्तीनंतर सदर रणगाडा पुणे येथील आयुध निर्माणितील डेपोत ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्याला भद्रावती येथे आणून त्याची स्थापना करण्यात आली. हा विजयंता रणगाडा नेहमी युद्धातील विजयाचा साक्षी राहून तो नव्या पिढीला प्रेरणा देत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.असे विजयकुमार, मुख्य महाप्रबंधक आयुध निर्माणी चांदा यांनी म्हटले आहे.