गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत भारतपोल पोर्टल सुरू केले

अमित शहा म्हणाले की “भारत पोल आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय तपास एका नव्या युगात घेऊन जाईल.“

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत भारतपोल पोर्टल शुरू केले आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की पूर्वी फक्त सीबीआय इंटरपोल संस्थेची जोडलेली होती.पण आता भारतीय एजन्सी आणि राज्यातील पोलीसही या जोडले जातील.पुढे ते असे म्हणाले की भारत पोल आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय तपास एका नव्या युगात घेऊन जाईल. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही कार्यक्षमतेने काम करत राहू सीबीआयनेच भारत पोलची निर्मिती केली आहे इंटरपोल च्या धरतीवर भारत पोल पोर्टल तयार करण्यात आले असून त्यामुळे तपास यंत्रणा सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून तातडीने मदत मिळणार आहे.
• भारत पोल पोर्टल तपास यंत्रणांना पुढील सुविधा पुरवते.
१) भारत पोल पोर्टल द्वारे सीबीआय केंद्र आणि राज्य स्तरावरील इंटरपोल मधील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकणार आहेत. तसेच पोर्टल वरच माहिती शेअर केली जाईल ई-मेल किंवा फॅक्स ची आता गरज भासणार नाही.
२) देशातील सर्व यंत्रणा सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे ऑनलाईन कट्टरतावाद ट्रक तस्करी मानवी तस्करी यासारख्या गुन्ह्यांवर एकत्रितपणे गुन्हेगारीला आळा बसेल.
३) भारत पोलच्या मदतीने राज्य पोलीस गुन्हेगारांविरुद्ध रेड नोटीस आणि इतर कलर कोड नोटिसा जारी करण्याची प्रक्रिया देखील सुलभ भाऊ शकेल.
• भारत पोल पोर्टल आणण्याची पुढील महत्वपूर्ण कारणे
१) सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे ऑनलाईन दहशतवाद संघटित गुन्हेगारी ट्रक तस्करी मानवी तस्करी आदींसह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे तपासा दरम्यान अनेक वेळा इतर देशांशी मदत घ्यावी लागत असल्यामुळे हे पोर्टल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
२) तसेच भारतात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे हे आजही सुरक्षा यंत्रणे समोर मोठे आव्हान आहे यासाठी भारतीय एजन्सी इंटरपोल सह इतर परदेशी सुरक्षा संस्थांची मदत घेतात पण आता भारत पोलच्या माध्यमातून इंटरपोल आणि इतर देशातून गुन्हेगारांचा डाटा तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल.