छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र
Trending
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्यावतीने गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाला सुरुवात


छत्रपती संभाजी : श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाला सुरुवात झाली. १८ वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या दोन दिवसीय गोविंद भाई श्रॉफ संगीत महोत्सव रविवारी सायंकाळी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या मैदानावर सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात महागमीच्या पार्वती दत्ता यांच्या नृत्याने महोत्सवाची सुरुवात झाली.महोत्सवाच्या पहिल्या सत्रात सूर्यवंदन व परमेलू सादर केले. तर दुसऱ्या सत्रात इटावा घराण्याचे जागतिक कीर्तीचे सत्तार वादक उस्ताद शाहिद परवेज यांनी रागबागेश्री मध्ये आलाप जोड, झाला घेत मध्यलय झपतालातील रचना सादर केली. उस्ताद शाहिद परवेज यांनी आला व बंदिश सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.युवा गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्यासह युगंधरा केचे हिचं शास्त्रीय गायन आज होणार आहे.