छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा 'सुवर्णवीर' – रवींद्र साळवे यांचा अमेरिकेत भीम पराक्रम..!
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी मिळविले दुसऱ्यांदा 'सुवर्णपदक'

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सध्या वैजापूर पोलीस ठाण्यात नियुक्त हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांनी पावर लिफ्टिंग या स्पर्धेत सुवर्णपदक तर बेंच प्रेस या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.या विजयानंतर त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर तिरंगा फडकावून भारताचा गौरव उंचावला.अमेरिकेतील बरमिंघम, अलाबामा (USA) येथे २६ जून ते ७ जुलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत रवींद्र साळवे यांनी सुवर्णपदक पटकावले.

जगभरातून 90 पेक्षा अधिक देशांचा सहभागया स्पर्धेत 90 हून अधिक देशांमधील पोलीस व अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.जगभरातील पोलीस दलात कौशल्य, फिटनेस आणि शौर्य याचे प्रतीक असलेल्या या स्पर्धेत रवींद्र साळवे यांनी या पूर्वीही जागतिक पातळीवर देशाकरिता सुवर्णपदक विजेता रवींद्र साळवे यांनी यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये कोलंबिया, दक्षिण अमेरिका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीने भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
अभिनंदनाचा वर्षाव रवींद्र साळवे यांच्या या यशाबद्दल विविध पोलीस अधिकारी, सहकारी आणि वरिष्ठांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये खालील मान्यवरांचा समावेश आहे: मा. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधीक्षक भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधीक्षक पूजा नागरे, पोलीस निरीक्षक रवीकुमार दरवडे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सरजगेश दैत्य, सुरेश वर्मा, सौरभ कल्लोळे, वैभव थोरात आदींनी त्यांचे आभार केले आहे.
त्यांनी केवळ पोलीस दलाचं नव्हे तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताचं नाव जागतिक स्तरावर उज्वल केलं आहे.त्यांचं हे यश आजच्या पोलीस दलातील जवानांना प्रेरणादायी ठरणार आहे. मा.रवींद्र साळवे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून आणि छत्रपती संभाजी नगर मधून त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांनी केलेला भीम पराक्रम सर्वांना प्रेरणा देणारा आहे.
