
शुद्र म्हणु का स्वर्ण म्हणु , काही कळना ही कला विठ्ठला कोडच पडलंय मला !!ध्रृ
एसीचा तुला व्दृष्य भारी ! ओ,बी,सी, करे शिरजोरी !! तुझ्या दाराची चढेणा पायरी !! पंढरीचा तु महार झाला !! विठ्ठला कोडच पडलंय मला !!
वैष्य असुनी महार कैसा!! महार होवूनी स्वर्ण कैसा !! दामाजीचा खंड तोडीला !! बादशहा चकित झाला !! विठ्ठला कोडच पडलंय मला !!२!!
चोख्याला ना तु जवळ घेतले!! पायरीच्या शुद्र म्ठेहणुनी ठेविले !! जन्मभर तुझे नाव घेतले !! जात जातीसी बैमान झाला !! विठ्ठला कोडच पडलंय मला. !!३!!
सारेच तुझ्या गावाला !! दुर ठेवसी तु अस्पृश्यांला !! अहिंसेचे तुम्ही पालनकर्ता !! म्हणुन तुझा हा बोलबाला !! विठ्ठला कोडच पडलंय मला !!४!!
रमा म्हणे आपल्या पतीला !! जावु दोघेजण त्या पंढरपुराला !! पंढरपूर करु नागपुराला !! मोरे,चोखा त्यांने दुर केला विठ्ठला कोडच पडलंय मला !!५
कवि, बबनराव मोरे समाज भुषण हिंगोली, प्रचारक, गौतम घनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप वेळ ७२१८५०६४४६/७६६६७४९३०३/९/७/२०२५