छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीय
Trending

मागासवर्गीय वसाहतींवर सुरू असलेली बेकायदेशीर बुलडोजर कारवाई थांबवा बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करा

नसता प्रशासनाच्या हुकुमशाही विरोधात आंंबेडकरी समाज रस्त्यांवर उतरणार

द फ्रेम न्यूज

छत्रपती संभाजीनगर : आज पक्षीय आंबेडकरवादी पक्ष, संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने मा.जिल्हाधीकारी श्री.दिलीप स्वामी यांना जाहीर निवेदन देण्यात आले की, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सुरू केलेली अतिक्रमण मोहीम शहरातील गोर-गरीब, कष्टकरी, कामगार, वंचित, दलित, पिडीत बहुजन समाजाच्या जिवावर उठली आहे. यामध्ये दलित पँथर च्या समाजिक लढ्यात अनेक शहीदांनी आपले रक्त सांडवून दिवंगत पँथर नेते गंगाधरजी गाडे साहेब यांच्या नेतृत्वात या स्लम वसाहती निर्वासीत वंचित बांधवांना निवारा मिळावा म्हणून उभारण्यात आल्या होत्या. या वसाहती योजनांचा शासन निर्णयाद्वारे नियमीतही करून दिल्या आहेत व अनेक शासकीय योजनांचा लाभ घेवुन येथील गोर गरीब समाजाने झोपडपट्ट्यांचे रूपांतर आपल्या घामाच्या पैशाने पक्क्या घरांमध्ये केले ज्यांची घरे रोडला आली त्यांनी कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी दुकाने थाटुन छोटेमोठे व्यवसाय करण्यास सुरूवात केली होती. त्याच दरम्यान नामांतर लढ्याचे प्रतीक म्हणून विद्यापीठ कमाणीच्या कमाणीसमान नामांतर योद्ध्यांच्या बलीदानाची साक्ष देणाऱ्या समतेचे समाजिक संघर्षाचे प्रतीक समजल्याजाणाऱ्या विद्यापीठ कमाणीच्या प्रतीकमाणी अनेक दलित वसाहतींमध्ये बांधण्यात आल्या आहेत. त्यांच प्रमाणे एक प्रती कमाण मुंकुदवाडी संजयनगर या ठिकाणी होती. परंतु शहरातील काही सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत् सत्तेचा दबाव प्रशासनावर टाकुन विकासाच्या रस्तारुंदीकरणाच्या नावे या ५० ते ६० वर्ष जुन्या वसाहती. सामाजिक अस्मीतेच्या प्रतीके असलेल्या कमाणी, निळ्या व पंचशिल धार्मिक झेंड्यांचे चौक, बौद्ध विहारांची कमाण समाजबांधवांना पूज्यनीय भिक्खसंघाला विश्वासत न घेता जेसीबीने अध्वस्त केली आहेत. आणि आता चिकलठाणा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकही तोडण्याचा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. परंतू इतर धार्मीक स्थळांचे अतिक्रमण न काढता केवळ आंबेडकर समाजाचे अस्मीता असलेल्या कमाणी, झेंडे, महामानवाचे स्मारक काढण्यात येत आहे. यामुळे एका दलित बहुजन समाजाला जाणिवपूर्वक टारगेट करून आमच्या धार्मिक भावना दुःखावण्याच्या प्रकार शहरात घडत असून यामुळे समस्त आंबेडकरी समाजाला टारगेट करून अगोदर हर्सल, मुंकुदवाडी, चिकलठाण, कंचनवाडी नक्षत्रवाडी विश्रांतीनगर या वसाहती उध्वस्त करण्याचे षडयंत्र येथील काही सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आखले आहे का असा संशय व असुरक्षीततेची भावना मागासवर्गीय, दलित, बहुजन समाजाच्या मनात निर्माण होत आहे.या कारवाईमध्ये महानगरपालिका प्रशासनाला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निकासी आणि पुनर्विकास) कायदा १९७१, दुरूस्ती २०१७ मधील तरतुदी आणि कायदेशीर जबाबदाऱ्यांचीही पायमल्ली करतांना येथील मनपा प्रशासन दिसत आहे. कारण या शासननिर्णयानुसार या कायम केलेल्या वसाहतींना निष्कासीत करण्याअगोदर त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश असतनांही कुठल्याही प्रकारचे बाधीत होणाऱ्या मालमत्तांचे पंचनामे न करता या मालमत्ता उध्वस्त करण्यात येत आहे. सदरील वसाहतीत उदरनिर्वाह करणारे गोर गरीबांचे निवासी घरे तोडल्याने त्यांच्यावर उपासमारिची वेळ आली आहे. प्रशासनाकडून त्यांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. व आमच्या सामाजिक अस्मीतेचे प्रतिके तोडून आमच्या सामाजिक धार्मिक भावना दुःखावणाऱ्या जबाबदार अधिकारी मनापा आयुक्तावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा नसता येत्या ०७ दिवसांत शहरात समस्त आंबेडकरी समाज व आंबेडकरवादी पक्ष, संघटनाच्या वतीने प्रशसनाविरोधात भव्य महामोर्चा काढण्यात येईल असा इशारा आज प्रशासनास आंबेडकरी संघटनांच्या वतीने प्रशासनास देन्यात आला आहे. यावेळी आंंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे,अमित मगरे, विशाल इंगळे, अरविंद कांबळे,सचिन जोगदंडे, सचिन बागुल,सोनू नरवडे, कपिल बनकर, महेंद्र काटेकर, संतोष चव्हाण,स्वागत उटीकर, राजकुमार कांबळे, भगवान खिल्लारे, प्रशांत म्हस्के, सुरेश सोनट्टके,विजय शिंगारे,अनामी मोरे,क्रृष्णा शरणागत, शैलेश मकासरे व मोठ्या प्रमाणावर निष्ठावान भिमसैनिक समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker