डॉ. सुरेश सिरसीकर आणि डॉ. अपर्णा मेहता राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कोल्हापुरात सन्मानित

छत्रपती संभाजीनगर : ३०/०६/२०२५
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर च्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरचे होल्डिंग हॅन्ड्स चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश सिरसीकर व होल्डिंग हॅन्ड्स च्या सचिव डॉ. अपर्णा मेहता यांना राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापुर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. सोमनाथ कदम, भरत लाटकर, डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके, संस्थेच्या अध्यक्षा अंतिमा कोल्हापूरकर या मान्यवरांच्या हस्ते ‘ राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार – २०२५ ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पुस्तके असे होता.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याना दरवर्षी राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
छत्रपती संभाजी नगरचे डॉ. सुरेश सिरसीकर आणि डॉ अपर्णा मेहता यांना सामाजिक कार्यात विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळालेली आहे. डॉ. सुरेश सिरसीकर आणि डॉ अपर्णा मेहता यांची होल्डिंग हॅन्ड्स ही संस्था आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर काम करते. ही संस्था आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक, महिला सबलीकरण तसेच सामाजिक बांधिलकी असलेले सर्व उपक्रम राबवित असते.
संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणावर काम करत आहे. पुण्यात एक महिला प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र आहे, ज्यामध्ये अनेक महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळाला आहे. कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त आणि कोविड-१९ मध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोविड-१९ मध्ये घाबरलेल्या लोकांसाठी देशभरात मोफत टेलिफोनिक समुपदेशन हेल्पलाइन सुरू केली होती आणि अनेकांना अन्नधान्य आणि इतर मदत पुरवली होती. सध्या थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती स्पर्धा आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये सात देश सहभागी आहेत. थायलंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्याच्या अनावरण होल्डिंग हॅन्ड्स च्या उपस्थित झाराजर्षी शाहूले होते. जपानच्या टोकियो येथील हॅपी सायन्स युनिव्हर्सिटीकडून डॉ.सुरेश सिरसीकर आणि डॉ अपर्णा मेहता यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. थायलंडमध्ये बाबासाहेबांच्या पहिल्या पुतळ्याच्या अनावरणात डॉ. सुरेश सिरसीकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात होते. श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी डॉ. सुरेश सिरसीकर आणि डॉ अपर्णा मेहता यांचे स्वागत केले. अनुराधापुरा येथे पंचशील ध्वज समारंभात श्रीलंकेचे सामाजिक न्याय मंत्री विजयदास राजपक्षे यांनी डॉ .सुरेश सिरसीकर आणि डॉ अपर्णा मेहता यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक उत्सव परिषदेत हो ची मिन्ह सिटी व्हिएतनाम – २०२५ मध्ये डॉ . सुरेश सिरसीकर आणि डॉ अपर्णा मेहता यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. वॉशिंग्टन येथे मुख्यालय असलेल्या ग्लोबल ह्यूमन राईट्स ट्रस्टच्या जम्मू आणि काश्मीर शाखेने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. याबरोबरच , समाज भूषण पुरस्कार २०२४- तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे, समाज भूषण पुरस्कार- (2022) तेजस फाउंडेशन, नाशिक, कर्करोग मुक्त महाराष्ट्र पुरस्कार (२०२२) आरोग्य जागृती असोसिएट, औरंगाबाद, समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट अँड वुमेन्स लिबर्टी, पुणे तर्फे कपिल मटका कृतज्ञता पुरस्कार (२०२३), सेवापथ सोशल फाउंडेशन, औरंगाबाद तर्फे आदर्श सेवा गौरव पुरस्कार (२०२३), नारी शक्ती पुरस्कार, तेजस फाउंडेशन २०२२, नाशिक, कला गौरव पुरस्कार (२०११) – काव्या मित्रा, पुणेइत्यादी अनेक पुरस्कारांनी डॉ. सुरेश सिरसीकर आणि डॉ अपर्णा मेहता सन्मानित आहेत. डॉ. सुरेश सिरसीकर हे चित्रपटक्षेत्राशी संबंधित असून अनेक चित्रपट आणि मालिका मध्ये दिग्दर्शक आणि सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. ते चित्रपट निर्माते ही असून चित्रपट आणि मालिका निर्मिती केली आहे. ते स्तंभ लेखक असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये त्यांचे लेख आलेले आहेत. पुण्याच्या ” शब्दशिल्प ” त्रैमासिकाचे संपादक ही आहेत.