त्रैमासिक पेन्शन अदालत व दूरसंचार जनजागृती कार्यक्रम
सीसीए महाराष्ट्र व गोवा यांच्यावतीने आयोजन

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : दिनांक: २७/०६/२०२५
भारत सरकारच्या पेन्शनसंबंधी तक्रारींचे वेळेत व प्रभावी निवारण करण्याच्या प्रतिबद्धतेनुसार, द कम्युनिकेशन अकाउंट्स कंट्रोलर (सीसीए), महाराष्ट्र व गोवा कार्यालयाने दिनांक २७ जून २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक कार्यालयात त्रैमासिक पेन्शन अदालत व दूरसंचार जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चंद्र झा, नियंत्रक, सीसीए महाराष्ट्र व गोवा हे होते. तसेच कार्यक्रमाला डॉ. तेजस रमाकांत माहिरे, उपनियंत्रक, सीसीए महाराष्ट्र व गोवा यांचे सुध्दा मार्गदर्शन लाभले.पेन्शन अदालतेत दूरसंचार विभाग व बीएसएनएलमधून निवृत्त झालेले कर्मचारी तसेच कुटुंब पेन्शनधारक यांच्या प्रलंबित पेन्शनसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात आले. एकूण ३८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या सर्वांचे त्वरित निवारण या सत्रात करण्यात आले. संबंधितांना ही माहिती एसएमएस, ईमेल किंवा टपालाद्वारे कळविण्यात आली होती.
या प्रसंगी बोलताना डॉ. सतीश चंद्र झा यांनी पेन्शनधारकांच्या सन्मान व सुलभतेसाठी तक्रारींचे वेळेवर व प्रभावी निवारण महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून काम करण्याची सीसीए कार्यालयाची कटिबद्धता त्यांनी अधोरेखित केली.दुपारच्या सत्रात परवाना धारकांना परवाना करारातील महत्त्वाच्या अनुपालन आवश्यकता यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी दूरसंचार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सत्रात खालील मुद्दे समाविष्ट होते.