आंतरराष्ट्रीयक्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending
बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेनं दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई ॲलथलेटिक्स स्पर्धेत पटकावलं सुवर्ण पदक..!
तीन किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं

दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई ॲलथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं तीन किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. याबद्दल बीड जिल्ह्यातल्या मांडवा या त्यांच्या गावी आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थ तसंच अविनाशच्या प्राध्यापकांनी त्याच्या कुटुंबियांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. यावेळी अविनाशची आई वैशाली साबळे आणि वडील मुकुंद साबळे यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.