भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात १७ विद्यार्थिनींची पहिली तुकडी पदवीधर
.भारतीय सशस्त्र दलातील महिलांकरिता हा ऐतिहासिक क्षण मानला जातोय.

पुणे : पुण्यात एनडीएचा दीक्षांत सोहळ्यात भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच १७ विद्यार्थिनींची तुकडी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तून (एनडीए) पदवीधर झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच तुकडीतील कॅप्टन श्रीती दक्ष हिने काला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. (एनडीए) मध्ये खडतर प्रशिक्षण घेऊन महिलांची पहिली तुकडी पास आऊट झाली आहे. हे प्रशिक्षण शारीरिक मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षण असतं अत्यंत तीन वर्ष खडतर प्रशिक्षण असतं हे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलातील पहिली १७ महिलांची तुकडी आज पास आऊट झाली आहे.

प्रशिक्षण शारीरिक मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षण असतं अत्यंत तीन वर्ष खडतर प्रशिक्षण असतं हे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलातील पहिली १७ महिलांची तुकडी आज पास आऊट झाली आहे.भारतीय सशस्त्र दलातील महिलांकरिता हा ऐतिहासिक क्षण मानला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये दिलेल्या निर्णयाने महिलांना एनडीएचे दरवाजे खुले झाले त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यूपीएससी काटेकोर प्रवेश प्रक्रिया राबवली त्यातून १९ विद्यार्थिनींची पहिल्या तुकडीची निवड करण्यात आली त्यामध्ये १९ पैकी १७ विद्यार्थ्यांनी तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केली.. या संचलनात सहभागी झाल्यानंतर महिला छात्रांनी पुशअप्स मारून आपल्या यशाचा जल्लोष केला. या कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एनडीएचे प्रमुख व्हाईस ॲडमिनरल गुरुचरण सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.