बीड सर्वपक्षीय मोर्चात एकमुखाने मागणी
वाल्मीक कराडला अटक करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या..!
वाल्मीक कराडला अटक करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या..!

बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा स्वरूपाची मागणी शनिवारी सकाळी बीड शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चामध्ये सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील गावागावातून सर्वधर्मीय व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. तसेच मोर्चामध्ये सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी सहभागी झाले होते. वाल्मिक कराडला अटक करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा मागण्या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी केल्या. आरोपींना अटक झाली नाही तर हे आंदोलन राज्यभर करण्याचा करण्याचा इशारा देण्यात आला.
“जसे काल आभाळ आले होते, हा सूर्य झाकला होता, आज ऊन पडले तर तो सूर्य पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेले माझे बाबा मला पुन्हा दिसणार का? असा सवाल उपस्थित करत, अशी वेळ कोणावरही येऊ नये, सर्वांनी खांद्याला खांदा लावून सोबत राहावे “( वैभवी देशमुख ) संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी आवाहन केले आहे.