छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्र
Trending

नवतेजस्विनी प्रकल्प अंतर्गत ‘माविम’ बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार

७ ते रविवार दि.९ मार्च दरम्यान जिल्हा परिषद मैदान

छत्रपती संभाजीनगर,दि.०३/०३/२०२५ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळावा महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत शुक्रवार दि.७ ते रविवार दि.९ मार्च दरम्यान जिल्हा परिषद मैदान, औरंगापुरा, छत्रपती संभाजीनगर येथे बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या जिल्हा स्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात ५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात येणार आहे. तसेच दररोज विविध विषयावर परिसंवाद व बचत गटातील उद्योजक महिलांच्या मनोगताचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बचत गटातील उद्योजक महिलांचा सन्मान केला जाणार आहे. सर्व प्रकारचे डाळ, तांदळाचे पापड, शेवाया, शोभेच्या वस्तू, तूप, लोणची व इतर वस्तू, पदार्थ या प्रदर्शनात मांडण्यात येतील. या वस्तू विक्रीसाठीही उपलब्ध असतील.या मेळाव्यास भेट द्यावी तसेच बचत गटांनी उत्पादीत केलेल्या साहित्य व वस्तुंची खरेदी करावी,असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी  चंदनसिंग राठोड यांनी केले आहे.अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button