ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रमुंबईविधानसभा
Trending

लाडक्या बहिणींना कधी मिळणार पुढील हप्ता? मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा.!

जागतिक महिला दिनाचे' औचित्य साधून विधिमंडळाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे

मुंबई : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिला भगिनींना पडला होता. राज्यातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिना १,५०० रुपये दिले जात आहेत. बऱ्याच राज्यातील लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता पण आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन यानिमित्त तटकरे विधिमंडळात आल्या होत्या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी समाजाला त्यावेळी त्यांनी असे सांगितले की ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून विधिमंडळाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे . असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.त्या म्हणाल्या येत्या ८ मार्च रोजी विधिमंडळाचे विशेष सत्र सुरू होणार आहे त्या दिवशी खास महिला लोकप्रतिनिधींसाठी व राज्यातील महिलांसाठी हे विशेष सत्र असेल याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी बहीण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बाबतही महत्त्वाची माहिती जनतेला द्यायचे आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या ८ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करणार आहोत. तसेच दरवर्षी जगभरात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचं अवचित्य साधत राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करून महिला दिन साजरा करणार आहे”. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. त्या आज विधान भवन परिसरात बोलत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button