खिलाडी कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाचा जगभरात धुमाकूळ,आतापर्यंत कमावले इतके 'कोटी'
'स्काय फोर्स' ची कथा १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्थान युद्धावर आधारित ॲक्शन चित्रपट आहे.

द फ्रेम न्यूज
मुंबई : बाॅलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता चार दिवस झाले आहे. ‘स्काय फोर्स’ २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.या चित्रपटाला चांगले ओपनिंग सुद्धा मिळाले आहे.
चित्रपटाने चार दिवसात महाबंपर कमाईची सुरूवात केली आहे. अक्षय कुमारने ‘स्काय फोर्स’ नवीन चित्रपटाच्या माध्यमातून वर्षाची सुरूवात केली आहे.या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात किती कोटींची कमाई केली जाणून घेऊ.
चित्रपटाने देशांतर्गत ६८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात ८१ कोटी रुपये कमावले आहे. मात्र मॅडॉकच्या रिपोर्टनुसार, ‘स्काय फोर्स’ चित्रपटाने देशांतर्गत ७० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर जगात ९२.९० कोटी रुपये कमावले आहे.
स्काय फोर्स’ 4 दिवसांचे कलेक्शन
पहिला दिवस – १५.३० कोटी
दुसरा दिवस – २६.३० कोटी
तिसरा दिवस – ३१.६० कोटी
चौथा दिवस – ८.१० कोटी
‘स्काय फोर्स’ ची कथा १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्थान युद्धावर आधारित ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची पार्श्वभूमी देशभक्ती वर आधारित आहे.
भारत-पाकिस्तान युध्दात घडलेला प्रसंग आणि कथा या चित्रपटात सांगण्यात आली आहे. अक्षय कुमार आणि वीरसोबत या चित्रपटात सारा अली खान, निम्रत कौर हे कलाकारही आहेत. अक्षय कुमारसोबत ‘स्काय फोर्स’मध्ये वीर पहाडिया मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
अक्षयकुमार आणि वीरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.हा चित्रपट १६० कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. ‘स्काय फोर्स’ चित्रपटातून वीर पहाडिया याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.