नायलॉन मांजामुळे पोलिस उपनिरीक्षकाचा गळा चिरला; ३५ टाके पडले
पोलीस घटनास्थळी जाऊन नायलॉन मांजा व पतंग उडविणाऱ्यांचा शोध घेत आहेत

छत्रपती संभाजीनगर : नायलॉन मांजामुळे दुचाकीने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना मंगळवारी सकाळी सुधाकर नगर सातारा परिसरात घडली आहे पोलीस उपनिरीक्षकाचा गळाचरल्याने मोठा रक्तस्राव झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी उपनिरीक्षकाचे नाव दीपक पारधे असे असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दीपक पारधे हे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकी निघाले होते सातारा परिसरातील सुधाकर नगर भागात त्यांच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला यात पारधे माझ्यामुळे लटकली गेले गळा चिरल्याने मोठा रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दीपक यांच्यावर तासभर ३५ टाक्यांची शस्त्रक्रिया चालली त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नस सह अन्य दोन प्रमुख धमन्या कापल्या गेल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने २ पिशव्या रक्त द्यावे लागले अशी माहिती डॉक्टर उमेश टाकळकर यांनी दिली. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सातारा ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली. घडलेल्या प्रकारचा पोलीस घटनास्थळी जाऊन नायलॉन मांजा व पतंग उडविणाऱ्यांचा शोध घेत आहेत.