छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रवादी- अजित पवार
Trending

लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हफ्ता कधी,आणि किती येणार?

निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलां विरोधात तक्रार आल्यास कारवाई होईल

२०२४ पासून सुरू झालेली महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या योजनेचा फायदा आतापर्यंत २ कोटी ५२ लाख महिलांना झाला आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये सरकारने महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले. मात्र, जानेवारी महिना संपत असतानाही अद्याप नवीन हप्ता मिळालेला नाही, यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे महिलांना एकूण ९००० रुपये मिळाले आहेत. डिसेंबरमधील हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता जमा होईल. पण, अद्याप सरकारने याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे महिलांकडून प्रश्न विचारले जात आहेत, “जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार?” हि उत्सुकता वाढली आहे.

महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले आहे.

तर “ज्या महिलांना या योजनेसाठी पात्रता नाही, त्यांनी स्वतःहून योजना सोडावी,” असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले होते. त्यांनी यावर खुलासा करताना सरकारने आतापर्यंत दिलेली रक्कम परत मागणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलां विरोधात तक्रार आल्यास कारवाई होईल, असा इशाराही सरकारने दिला आहे.

जानेवारी २०२५ चा हप्ता १५०० रुपयेच असेल, कारण निधी वाढवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button