ग्राहकांनो विज बिल थकबाकी भरा..! अन्यथा एन उन्हाळ्यात होईल कारवाई.
शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रातील व इतर ग्राहकांकडे महावितरणाचे 208 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली जमा करण्याकरिता महावितरणाने कंबर कसली आहे. त्याकरिता महावितरणाने उपविभागणीय पथके तयार केली आहेत ग्राहकांच्या सोयी करिता महावितरणाने शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच महावितरणाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट म्हणाले की “महावितरणाने वीज बिल वसुली मोहीम गतिमान केली असून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्या जात आहे ग्राहकांनी थकबाकीसह आपले चालू विज बिल भरून कारवाई होण्यापासून टाळावी व महावितरणास सहकार्य करावे”
तसेच महावितरणाने वीज बिलात सवलत मिळावी याकरिता काही उपाय सुचविले आहेत.
प्रॉम्प्ट पेमेंट डेट ला वीज बिल भरावे, जर ग्राहकाने ऑनलाइन वीज बिल भरल्यास बिलामध्ये ०.२५% आणि पहिल्या सात दिवसांत बिल भरल्यास १% अशी जवळपास १२५% सूट मिळते. तसेच ग्राहकांकरिता दुसरा पर्याय ही उपलब्ध आहे ‘गो ग्रीन’ पर्याय निवडा; आणि पैसे वाचवा. जसं की ग्राहकांनी छापील बीज बिलाऐवजी गो ग्रीन चा पर्याय निवडल्यास त्यांना मासिक बिल द्वारे पाठविले जाते शिवाय वीज बिलात मासिक १०₹ तर वार्षिक १२०₹ सवलत मिळते.