आंतरराष्ट्रीयछत्रपती संभाजीनगरतंत्रज्ञानताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईविज्ञानविदेश

दावोस मध्ये महाराष्ट्राने केले ६.२५ कोटींचे करार

उद्योगांच्या माध्यमातून ८७ हजार २३० लोकांना रोजगार मिळू शकतो.

द फ्रेम न्यूज

Oplus_131072

दावोस : स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत पहिल्याच दिवशी जगभरातील २० बड्या उद्योग समूहाने महाराष्ट्रात सुमारे ५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत.जर हे उद्योग प्रत्यक्षात सुरू झाल्यास या माध्यमातून ८७ हजार २३० लोकांना रोजगार मिळू शकतो.

जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत ६ लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या ३१ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारानुसार, गडचिरोलीत २५ मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. कल्याणी उद्योगसमुहासोबत संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण क्षेत्रात, तर विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत पोलाद आणि धातू क्षेत्रात सामंजस्य करार झाले. छत्रपती संभाजीनगर इथं एबी इनबेव, अवनी पॉवर बॅटरीज आणि जेन्सोल यांची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच कल्याणी उद्योग समूह गडचिरोलीत ५२०० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प, ४००० रोजगार निर्मिती होनार आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रत्नागिरीत संरक्षण क्षेत्रात १६,५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यातून २४५० रोजगार उपलब्ध होणार आहेत.

बसालोर आलाॉय, पालघरमध्ये १२००० कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यातून ३५०० रोजगारांची निर्मिती सुद्धा होणार आहे.

जेएसडब्ल्यू समूह, गडचिरोली ३ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यातून १० हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे .

वारी एनर्जी नागपुरात सौर ऊर्जा क्षेत्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून ७५०० रोजगार निर्मिती सुद्धा होईल.

ब्लॅक स्टोन मुंबई महानगर क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यामधून १००० रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.

एच२ई पाॅवर पुण्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यातून १८५० रोजगार निर्मिती होईल.

बुक माय शो, ही कंपनी १७०० कोटींचे गुंतवणूक करणार आहे त्यामधून ५०० रोजगार निर्मिती होईल.

टाटा समूहाची विभिन्न क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात ३० हजार कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे त्यातून अनेक रोजगारांची निर्मिती होणार आहे.

तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये पंधरा हजार कोटींच्या गुंतवणुकीचे तीन प्रकल्प येणार आहेत त्यातून ५५३५ जणांना रोजगार मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button