ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रमुंबई
इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहनी मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
तसेच एप्रिल २०२६ पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस


मुंबई : दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली. हे स्मारक जागतिक दर्जाचे करावे. तसेच एप्रिल २०२६ पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस असून स्मारकाचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना मंत्री श्री.संजय शिरसाट यांनी दिल्या आहेत तसेच स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही ते म्हणाले.