
सध्या थंडीच वातावरण आहे आणि या काळात शरीर उबदार ठेवणं गरजेचं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की या थंडीमुळे तुम्ही आजारी पडू नये अशावेळी आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजचे आहे. थंडी खूप पडत असल्याने लोक घराबाहेर जाणे टाळतात परिणामी शरिराची हालचाल कमी होते. या कमी झालेल्या गतिशीलतेमुळे अपचन, जळजळ आणि कधीकधी मनःस्थिती देखील बिघडते. त्यामुळे हे सगळे टाळण्यासाठी हिवाळ्यात व्हिटॅमिन बी ६ ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा अन्नात समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षम तर व्हालच, पण तुमच्या शरीरातील उर्जा टिकून राहील.हिवाळ्यात कोणते पदार्थ खावे..?
गाजर -गाजर हे व्हिटॅमिन बी ६ ने परिपूर्ण असून हिवाळ्यात ते खाणे अत्यंत फायद्याचे आहे. एका मध्यम आकाराच्या गाजरापासून एक ग्लास दुधाइतके व्हिटॅमिन बी ६ मिळते. तसेच गाजर हे फायबर, व्हिटॅमिन एचा उत्तम स्त्रोत आहे.
दूध -आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी ६ ने परिपूर्ण असणारे दूध हा अत्यंत चांगला स्त्रोत आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांनी दूध पिणे आवश्यक आहे. थंडीत गरम दूध प्यायल्यास आराम मिळेल.
केळी- वजन कमी करायचे असेल तर रोज केळे खाणे महत्वाचे आहे. केळं खाल्ल्याने व्हिटॅमिन बी 6 व्यतिरिक्त़ विविध अँटिऑक्सिडंट्स, फायबरही मोठ्या प्रमाणात मिळतात.
पालक -पालकात लोह, फोलेट आणि पोटॅशियम असते. हिवाळ्यात तुम्ही रोजच्या जेवणात पालकाचे विविध प्रकार करून तो जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा.
अंडी – थंडीत तुम्हाला उबदार ठेवण्याबरोबरच हेल्दी राहण्यासाठी अंड खाणे फायद्याचे आहे, तुम्ही ऑम्लेट किंवा उकडूनही ते खाऊ शकता.
मटार- हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात ताजे मटार मिळतात. त्यात व्हिटॅमिन बी-6 चांगल्या प्रमाणात असते. मटार घालून थंडीत तुम्ही विविध पदार्थ करू शकता.
आवळा – आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. तसेच श्वसनमार्गाचा जंतूसंसर्ग कमी होण्यास आवळा अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे या काळात आवळा आवर्जून खायला हवा. फुफ्फुसांच्या पेशींचे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आवळा चांगला.
हिरव्या पालेभाज्या – आहारात या हिरव्या पालेज्यांचा समावेश करा हिवाळ्यात तुमच्या आहारात मेथी, चवळी आणि मोहरीच्या हिरव्या पानाची भाजी यांचा आहारात समावेश करा. या तीन हिरव्या भाज्या खायला स्वादिष्ट लागतात, याशिवाय त्यांच्या सेवनाने शरीराला आतून उष्णता मिळते. आणि पोषणमूल्य वाढून रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते. हिरव्या भाज्यांमध्ये तेलमसाल्यांचा फारसा वापर होत नाही, त्यामुळे फिटनेसच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.त्यामुळे थंडीत चांगल्या आहाराचा तुमच्या दररोजच्या दैनंदिन जीवनात उपयोग करा.यातून नक्कीच तुम्हाला फायदा होईल.