आज डॉ.सवितामाईंची १२५ वी जयंती निमित्ताने त्यांना कोटी कोटी अभिवादन प्रणाम भावपुष्प अर्पण करू या ?

द फ्रेम न्यूज नेटवर्क
जानकाबाई गरोदर असताना दिवसभरात काम केले, संध्याकाळच्या चुलीला आवतंन देवून भाजी भाकऱ्या थोपटून सर्वांना पोटभर खावू घालून घरातले सर्व शांतचित्ताने झोपी गेले होते, पण मनात एक विचार येत होता, की आज माझ्या पोटात वाढतं असलेल्या बाळाचे चाहूल लागत आहेत,
आपणथोडी फार अर्ध्या कोराचे कुटक्यांचे घास चावले आणि घशाच्या खाली उतरविणे गरजेचे आहे, कारण कळा देण्यासाठी अंगात बळ पाहिजे ना ? आख्खी रात जागुन काढावी लागली, घरात मिनमिनता दिवा, कृष्णराव आपले विचार करत बसले होते,
पण तस हे घरान सुशिक्षित असल्यामुळे तसा काही तान उरला नव्हता, शेजारीन बाईला बोलावून आनले,ती दाईन खुपचं चतूर होती, ती जानकाबाईला धिर देत म्हणाली, आंग जानके तु काय पहेलाडू हाय व्हय,
तसी जानकाईने स्वास सोडला आणि कळा सुरू झाल्या,तसी दिस निघता निघता पोरं जन्माला आली,आरे किसना लय गौड पोरं हाय बघ, तुमच्या घराण्याचे नाव उध्दरुनच नेईल, पाच दिसान पाचवी केली, आणि बाया पोरी बोलावून त्या पाळणा गात होत्या ?
पाळणा

सन एकोनिशे नव सालाला तारीख सत्ताविस जानेवारीला असा बाळाचा जलम झाला नाव शारदा शोभे पोरीला जो बाळा जो जो रे जो
जानकाबाई पोरीची आई लयी गुणवान पुढे ती होई कृष्णरावाचा उध्दार होईल कबिराचा पंथ अजमर होई जो बाळा जो जो रे जो
कानात कुर्रर्र बाळाला केले बाया बापड्यांने नाव शारदा ठेविले कबिर घराणे तेव्हा उध्दरुन गेले शारदा शारदा नाव बोलू लागले जो बाळा जो जो रे
नव्या सालाची नविन खुसी दोन्ही घर उध्दरेल बघ ना कसी जगी किर्ती गाजेल पोर ही असी सर्वांना होईल तिच्या कार्याची खुसी जो बाळा जो जो
शारदामाईची जयंती करु उर्फ सवितामाईला वंदन करु अवघ्याची आई चला चरण धरु सवितामाईच,सवितामाईची जयंती करु जो बाळा जो जो रे जो

तस हे कुटूंब सारस्वत ब्राह्मण ते मुळचे रहिवासी डोर्ले ता,जि, रत्नागिरी खेडेगावात राहणारे कृष्णराव आणि जानकाबाई, हे सुशिक्षित असलेल्या कारणाने आणि सदाही नौकरी करतं असतांना सर्व जातीधर्म ह्याकडेते त्या पासून दुर्लक्षित राहात होते, तेव्हा शारदाचे शिक्षण काही पुण्यात झाले,तर काही मुंबईत झाले, पण शारदाला आईवडिलांने चांगले शिक्षण दिले, तेव्हाजानकाबाईने गर्भपात केला असता तर, डॉ, बाबासाहेबांच्या आयुष्यात शारदा उर्फ सवितामाईआल्या नसत्या ,आणि डॉ, बाबासाहेबाचे उर्वरित कार्य अधुरे राहिले असते , जसे माहात्मा जोतिबा फुलेने सत्यशोधक समाज धर्माची निर्मिती केली होती,ती जागीच वितळून गेली,तसेच जर झाले असते तर या भारतामधली लोकशाही जिवंत झाली नसती, भारतीय ध्वज निर्माण झाला असता का ? या भारतामधून इंग्रज आपल्या मायदेशी गेले असते का ?, भारताला पुर्णजिवित करण्यासाठी संविधान घडले असते का ?आणि या जंब्मुदिपातल्या भारताला पुन्हा तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानाचे आकलन झालेच असते का, हे या मागचे विधान प्रस्थापित करण्यासाठी त्या सवितामाईचा कार्याची गरज होती, म्हणुन डॉ, बाबासाहेबांच्या उर्वरित आयुष्यात येवुन काळजी वाहाक झाल्या, तेव्हा जातीमोड जगातील पुर्णविवाह म्हणे हा अतंरजातीचा शुभ विवाह सोहळा घडवून आणला, आज दि,२७,१,२०२५ रोजी १२५ वर्ष होत आहेत, या जन्म दिनाच्या निमित्ताने हा विवाहसोहळा आणि जातीभेदाच्या दलदलीत हा जागतिक कोर्ट म्यारेज घडवून आणला, हा एक नवीन समाजाला संदेश देवुन गेले, या क्रांतिकारी शारदा उर्फ सवितामाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम त्रिवार वंदन सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंगलकामना धन्यवाद लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनस�