ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईलेख

सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणतात; 'कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही'..!

'चल हल्ला बोल' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण तो आता सेन्सर बोर्डाच्या कात्रीत अडकला आहे

द फ्रेम न्यूज

मुंबई : नामदेव ढसाळ हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी लेखक आणि दलित पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी, साहित्याच्या माध्यमातून वंचित दलितांच्या व्यथा गावकुसा बाहेरील राहणाऱ्या दलितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडणारे कवी, दलित चळवळीचे प्रमुख शिलेदार दलित पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष म्हणजेच पद्मश्री नामदेव ढसाळ होय, १९७२ साली त्यांचा पहिला कविता संग्रह ‘गोलपिठा’ प्रकाशित झाला त्यानंतर आणखी काही कवितासंग्रह प्रकाशित झाले. “मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले”, “तुझी इयत्ता कंची?’, “खेळ”, आणि “प्रियदर्शनी” हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध झाले. मराठी साहित्य जीवन गौरव पुरस्कार (२००४), पद्मश्री (१९९९) व “भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ २०१० आदींनी त्यांना गौरविण्यात आले होते.नामदेव ढसाळ यांनी लिहिलेलं साहित्य

• गोलपिठा (१९७२)

•मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)

•तुही यता कंची (१९८१)•खेळ (१९८३)

•या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)

•आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी (१९७६)

•आंधळे शतक – मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (१९८१)

•मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात

•तुझे बोट धरून चाललो आहेअसे असंख्य लेखन पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या लेखणीतून लिखाण केले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण तो आता सेन्सर बोर्डाच्या कात्रीत अडकला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितले की नामदेव ढसाळ यांनी ‘गोलपिठा’ या कविता संग्रहातून दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणले. या कवितांच्या ओळींवरच संसार बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच या चित्रपटाला यु सर्टिफिकेट सुद्धा नाकरण्यात आले आहे. तसेच ‘ए’ श्रेणी साठी सेन्सर बोर्डाने अनेक सूचना सुद्धा सुचवलेल्या आहेत. चित्रपटाचे निर्माते यांना संसार बोर्डाचे अधिकारी रेवनकर आणि सय्यद रफी हाश्मी यांनी नोटिसा सुद्धा पाठवलेल्या आहेत त्यात त्यांनी असे म्हटले आहे की “कोण नामदेव ढसाळ? आम्ही त्यांना ओळखत नाही”तसेच या चित्रपटातील त्यांच्या कविता काढल्या तरच या चित्रपटाला मान्यता मिळेल असेही नमूद केल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितले आहे. “आता सेंन्सर बोर्डाचेच डोके ठिकाणावर आहे’? का असेच म्हणावे लागेल!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button