छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्याराजकीय
अजंठा अर्बन काॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना अखेर अटक..!

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयातील अर्ज मागे घेतल्यानंतर झांबड शुक्रवारी पोलिसांसमोर शरण आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी झांबड यांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक केली. झांबड यांच्यावर वर्षभरापूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.