

मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा आघाडीचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने ९०७ गुणांची कमाई केली जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत मिळवलेली ही सर्वाधिक गुणसंख्या ठरली जात आहे. तसेच त्याने रविचंद्रन अश्विन चा ९०४ गुणांचा भारतीय विक्रमही मोडला गोलंदाजीतील क्रमवारीत आपले अव्वल स्थान अधिक केले.ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेजलहवूड हा दुसऱ्या स्थानी असून त्याच्यात आणि जसप्रीत बुमरामध्ये ६४ गुणांचे अंतर आहे. तसेच भारतीय अष्टपैलू खेळाडू फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा हा दहाव्या स्थानावर आहे.ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही कौतुक करत, माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्रा याने ” भारतीय संघात बुमराह नसता तर ही मालिका अगदीच एकतर्फी झाली असती असे भाष्य केले आहे. “