महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी छबुराव ताके यांची नियुक्ती
दैनिक मराठवाडा केसरीचे मुख्य संपादक छबुराव ताके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे

छत्रपती संभाजीनगर : द फ्रेम न्यूज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाध्यक्ष पदावर दैनिक मराठवाडा केसरीचे मुख्य संपादक छबुराव ताके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार सर्वानुमते मंगळवारी (दि.११) संघाच्या झालेल्या मराठवाडा स्तरीय बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.
प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत राज्य कार्यकारणी तथा मराठवाडा विभागाचे अध्यक्ष यांच्या सहमतीने जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली आहे.यावेळी महेंद्र कुमार डेंगळे, डॉ. प्रभू गोरे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष महादेव डोंबे, सचिन अंभोरे, मुकेश मुंदडा, विलास सिंघी,विकास सोनवणे, सतिष पाटील, रविंद्र लांडगे, अफसर कारभारी सह आदीची उपस्थिती होती.