स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम साजरा होणार
शहाजीराजे भोसले यांच्या ४३१ व्या जयंतीनिमित्त १८ मार्च रोजी सायंकाळी वेरूळ येथे शिवजागर या संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या ४३१ व्या जयंतीनिमित्त १८ मार्च रोजी सायंकाळी वेरूळ येथे शिवजागर या संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमा करिता चित्रपट सिनेमा अभिनेत्री अलका कुबल सोनाली कुलकर्णी पार्श्वगायक रवींद्र खोमणे आणि प्राध्यापक राज्य सरकटे तसेच अन्य कलावंत शिवजागर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती रविवारी पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री रावसाहेब दानवे पाटील माजी रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी शिरसाठ सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजी नगर, तसेच प्रमुख उपस्थिती माननीय श्रीमंत राजे भोसले नागपूर संस्थान माननीय श्री राजे शिवाजीराव जाधव सिंदखेड राजा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार प्रशांत बंब माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर माननीय श्री दिलीप गावंडे विभागीय आयुक्त तथा सदस्य स्वराज्य संकल्पक शहाजीराजे सल्लागार समिती महाराष्ट्र शासन, माननीय श्री दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले नियोजन आढावा समिती महाराष्ट्र शासन), माननीय श्री विनोद पाटील देवगिरी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, माननीय श्री प्रदीप पाटील मराठा शौर्य दिन समिती पानिपत अध्यक्ष, माननीय श्री मराठा राम नारायण कार्याध्यक्ष मराठा शौर्य दिन समिती, माननीय श्री नाना कदम अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती धुळे हे असतील.