आंतरराष्ट्रीयतंत्रज्ञानताज्या बातम्यादिल्लीविज्ञानविदेश
Trending

वैज्ञानिक सुनीता विल्यम्स आणि बूच बिल्मोर यांना आणण्याकरिता 'फाल्कन ९' रॉकेट घेतली झेप..!

NASA Space Crew -10 Mission,Falcon 9 रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं

द फ्रेम न्यूज नेटवर्क

फ्लोरिडा : अमेरिका अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच बिल्मोर यांना लवकरच पृथ्वीवर आणलं जाणार आहे.अमेरिका अंतरीक्ष एजेंसी NASA च्या कॅनडी स्पेस सेंटर येथून नासा आणि स्पेसएक्स यांनी या दोघांनाही सुरक्षित माघारी आणण्यासाठी स्पेसक्राफ्ट पाठवलं आहे. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी हे मिशन लाँच झालं आहे. भारतीय वंशाच्या वैज्ञानिक अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर बोईंग स्टार लाईनरच्या चाचणी मोहीमे करिता आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेले होते परंतु त्यांना अंतराळात जाऊन आता नऊ महिने उलटून गेले आहेत अद्यापही ते परत आलेले नाहीत कारण त्यांच्या अवकाश यानात बिघाड झाली होती.

सुनीता विल्यम्स आणि बूच बिल्मोर यांचे अंतराळातील फोटो

त्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या होत्या सुनीता विल्यम्स आणि बूच बिल्मोर यांना पृथ्वीतलावर परत आणण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.भारतीय वंशाच्या वैज्ञानिक सुनीता विल्यम्स व बूच बिल्मोर यांना पृथ्वी तलावर परत आणन्याकरिता नासा व स्पेस एक्स तर्फे १३ मार्च २१२५ रोजी मोहीम तयार करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण तयारी देखील करण्यात आली आहे १५ मार्च रोजी सकाळी ४: ३४ मिनिटांनी नासाचं यान अवकाशात झेपावले आहे. NASA Space Crew -10 Mission,Falcon 9 रॉकेटचा प्रक्षेपण करण्यात आलं त्यामुळे सुनीता विल्यम्स व बूच विल्मोर हे जून २०२४ पासून अंतराळात अडकले आहेत.२८१ दिवस पूर्ण होतील, त्यांना परत आणण्याकरिता ‘फाल्कन ९’ रॉकेट पाठवण्यात आले आहे त्यामुळे ते सुरक्षितपणे पृथ्वीतलावर येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button