"रुग्णालयांमध्ये दिव्यांगा करीता विशेष शिबिरे आयोजीत करा" - जिल्हाधिकारी
दिव्यांगांना आवश्यक असलेल्या योजना ठरवून त्यांना लाभ देण्याचे निश्चित केले जाईल.

छत्रपती संभाजीनगर : दिव्यांगांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावयाचे असून त्यासाठी दिव्यांगांची तपासणी व नोंदणी ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथे विशेष शिबिरे आयोजित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.
यावेळी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यात ग्रामिण रुग्णालय कन्नड, पाचोड, पैठण, उपजिल्हा रुग्णालय गंगापूर, वैजापूर येथे शुक्रवार दि.२८ मार्च व शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी शिबिरे होतील. उपजिल्हा रुग्णालय सोयग्व, सिल्लोड येथे २७ मार्च ३ एप्रिल , जिल्हा रुग्णालय व फुलंब्री येथे सोमवार दि.२४ मार्च, बुधवार दि.२६ मार्च, २ एप्रिल , शुक्रवार दि.२८ मर्च व ४ एप्रिल रोजी तपासणी होईल. हीशिबिरे सकाळी ९ ते दुपारी एक या वेळात होतील. या शिबिरांमध्ये तपासणीसाठी येतांना आधार कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र असल्यास ते तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. त्यावरुन दिव्यांगांना आवश्यक असलेल्या योजना ठरवून त्यांना लाभ देण्याचे निश्चित केले जाईल.
जाईल.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.बी, चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, आश्विनी लाटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, महानगरपालिकेचे समाज कल्याण उपआयुक्त लकीचंद चव्हाण, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे ए.के.शेख, जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉ. महेश लड्डा, बार्टी कार्यालयाचे प्रतिनिधी योगेश सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी चौरे, महाज्योती कार्यालयाचे चंद्रशेखर वडले, यांच्यासह समितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते.