छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्र
Trending
महाबोधि महाविहार मुक्तीसाठी आर पी आय (आठवले) गटाचे भव्य निदर्शने
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट च्या वतीने मंगळवारी दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाण सोडला महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी रिपाई चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुरावजी कदम, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवचरमल, लक्ष्मण हिवराळे, रवी जावळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.