जीवे मारण्याची धमकी देत ५० लाख रुपये खंडणी मागण्याचा आरोप
जमीन हडप प्रकरणी चावडा यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

सातारा परिसरातील मनपा हद्दीत, सातारा परिसरात असणारी १४१ गट क्रमांकाच्या जागेचा ७/१२ माझ्या नावे कायम असतांनाही पुष्पा कस्तुरचंद बडजाते, निलेश प्रकाशचंद्र कासलीवाल, मनोज फत्तेचंद पहाडे, प्रवीण माणिकचंद गंगवाल, विशाल कस्तुरचंद बडजाते यांनी खोटे कागदपत्र सादर करत मला जीवे मारण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा आरोप पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार निवेदनात जितेंद्र यदुनंदन चावडा यांनी केला आहे. सदरील सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे कि, पुष्पा कस्तुरचंद बडजाते, निलेश प्रकाशचंद्र कासलीवाल, मनोज फत्तेचंद पहाडे, प्रवीण माणिकचंद गंगवाल, विशाल कस्तुरचंद बडजाते यांनी खोटे कागदपत्र सादर करत माझी फसवणूक करत खोटा लिव्ह & लायसन्स हा क्ररार्नामा बनवला आहे. तत्कालीन दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून परस्पर माझी जागा मालकी हक्क तसेच भाडे तत्वावर देण्याचा कागदोपत्री प्रयत्न केला आहे. मात्र ५५७.६२ चौरस मीटर या जागेवर खोटा आणि बनावट दस्तावेज तयार करत स्वतःचा मालकी हक्क असल्याचा दावा करत आहे. सदरील जागा हि माझ्या स्वतः मालकीची असून याबाबतकायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे चावडा यांनी केली आहे. या संदर्भात अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या तसेच दादागिरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत निलेश प्रकाशचंद्र कासलीवाल यांनी पुष्पाबाई यांच्याकडू हि जागा घेत बांधकाम करत सून जीवे मारण्याची धमकी देत ५० लाख रुपये खंडणी मागत आहे. हि जमीन कोट्यावधी रुपयांची असून ती हडप करण्याचा प्रयत्न करत माझी आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात तक्रारदार जितेंद्र यदुनंदन चावडा यांनी केला आहे. मी वयोवृद्ध असुन या व्यक्ती पासून मला धोका असल्याचे सांगत सदरील इसमावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत न्याय देण्याची मागणी चावडा यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.