
नागरुन वखरुन तयारी झाली आईचीपेरण्यासाठी तयार व्हा रे सुचना काळ्या मायेची !!ध्रृ !!
मेघराज्याचा खलिता आला,!खत बियान आना घरला !!आता उन्हाळा मागे गेला !सात तारखीच्या या वाढदिवसाला !!पुरण पोळीचा केक करुनी पुजा करा धरणीची पेरणीसाठी तयार व्हा रे, सुचना काळ्या मायेची
आता शेतात तिफणीने तास काढा !तिफणीला हळदी कुखवाचा बांधा गुढा ,!!एक निवेध मातीत गाडा !धानं मुठीन चाड्यात सोडा !!तेव्हा धरणी देईल खाया सामुग्री आता वर्षाचीपेरणीसाठी तयार व्हा रे, सुचना काळ्या मायेची !!2!!
पेरलं सारं काळ रान !दे मुबलक आम्हाला अन्न धान !!तुझ्यामुळे आमची शांन !तुझ्या वाचून जगवल कोनं !!रात्रदिस कष्ट करतो नाथ जल्मो जल्माचीपेरणीसाठी तयार व्हा रे, सुचना काळ्या मायेची !!3!!
सर्व जिवंत तुझ्यामुळे !सजिव निर्जीवासी कळे !!तुडूंब भरती शेती धरण तळे !परी जगनं कुणाला ना कळे !!मोरे, किती गावु महती तुझ्या गुणाचीपेरणीसाठी तयार व्हा रे, सुचना काळ्या मायेची !! 4!!कवि, बबनराव मोरे समाज भुषण हिंगोली, प्रचारक,गौतम घनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे ग्रृप वेळ 4:457218506446/ 7666749303,