कामठा बु येथे श्वानाने १० जणांना घेतला चावा
जखमीवर विष्णुपुरी व मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले

The Frame News Network
राजकिरण गव्हाणे नांदेड (जिल्हा प्रतिनिधी)
दि.२३अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत लहान मुलासह नऊ ते दहा जणांना चावा घेतल्याची घटना शुक्रवारी घडली यात काही जणांना शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. परिसरातील शुक्रवारी पिसळलेल्या कुत्र्याने थैमान घालत अनेकांना चावा घेतला त्यात दौलतराव नानाराव देशमुख वय ६८, दत्ता सतीश कल्याणकर वय ८, केशरबाई मोतीराम कल्याणकर वय ६५, अशोक नागोराव गव्हाणे वय ४८, सोमेश उमेश मुस्तरे वय ११ यांच्या हाता पायाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. पिसाळलेल्या कुत्र्याने वाटेत येणाऱ्या अनेकांना चावा घेत इकडून तिकडे धुमाकूळ घातला परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जखमीवर विष्णुपुरी व मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात अँटी रेबीज औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना नांदेडला पाठवावे लागते. त्यामुळे औषधांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.