दमडीची अक्कल नाही,तो सुर्यावर थुंकतो ते तर वर असतो,असा का हा मुर्खपणा करतो. !! ध्रृ !!
स्मशानातले सोने काढण्या गेला होता एक नर !
दातात आडकले बोट,बाजुने होता लांडग्यांच्या कहर ,!!
मुडदे कधी बोलतात का तेच उखरत बसतो. !!१!!
थोरांची महती, शेखचिल्लाला कळनार बाबा !
मुडद्याने केलेत कर्म,पुसतो लावुन टेंभा !!
करून गेले ते काम खरं खोटं त्यांना पुसतो.!!२!!
मानसामुळे राज्य आहे, खुर्चीपाई गर्व आले !
ह्या बडबडबाता करुन राज्य इथेच सोडून गेले. !!
मुडदे आता काय सांगती, फुकट वादळ उठवतो !!
हूकूमशाही, राजेशाही, लोकशाही,कळेना हे काही !थोरांची किर्ती मोठी, तिथे अक्कलनाम शुन्य होई !!
गेल्या मांघारी त्या थोरांना काय फरक पडतो !!४!!
स्मशानातले सोने उखल्यापेक्षा आज बघा विज्ञान !हिंसाचाराचे धडे रेखाटल्यापेक्षा संस्कृतीची राखा शानकुकर्माचे समाजाला का शिकवुन आघात करतो !५!!
कवि, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ / ७६६६७४९३०३ दि,२२,३,२०२५